Talegaon Dabhade : भूगोल प्रज्ञा शोध परीक्षेत सरस्वती विद्या मंदिरची भूमी शिंदे राज्यात प्रथम

एमपीएसी न्यूज- भूगोल प्रज्ञा शोध परीक्षेत सरस्वती विद्या मंदिरची भूमी शिंदे राज्यात प्रथम आली आहे. मुंबई भूगोल अध्यापक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या भूगोल प्रज्ञा शोध परीक्षेचा सरस्वती विद्या मंदिरचा 100 टक्के निकाल लागला असून या शाळेची भूमी शिंदे हिने 100 पैकी100 गुण मिळवून राज्यात प्रथम आली आहे.

कुणाल अहिरराव ह्यास 98 गुण मिळून तो राज्यात दुसरा तर सिद्धी पाटील 96 गुण मिळवून राज्यात तिसरी आली आहे. या परीक्षेसाठी 8 वी ते 10 वीचे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांना शाळेच्या शिक्षिका छाया सांगळे यांनी मार्गदर्शन केले. छाया सांगळे यांना ‘उपक्रमशील भूगोल शिक्षक’ पुरस्कार प्राप्त झाला.

_MPC_DIR_MPU_II

यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे आणि शिक्षिका छाया सांगळे यांचे संस्थेचे अध्यक्ष सुरेश झेंड, मुख्याध्यापिका रेखा परदेशी, कार्यवाह प्रमोद देशक, पदाधिकारी दिलीप कुलकर्णी, विश्वास देशपांडे, सुचित्राताई चौधरी, अनुराधा तापीकर, ज्योती चोळकर यांनी अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1