Talegaon Dabhade: तळेगावात 61 लाख खर्चाच्या उद्यान नूतनीकरण कामाचे भूमिपूजन

Talegaon Dabhade: Bhumipujan of garden renovation work at a cost of Rs 61 lakh in Talegaon या नुतनीकरण कामात उद्यानात जाळी बसवणे, पेव्हर ब्लॉक बसवणे, नवीन लॉन्स टाकणे, समुद्रातील वाळू टाकणे, वॉचमनसाठी केबिन निर्माण करणे आदी कामांचा समावेश आहे.

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील राव कॉलनीतील उद्यानाच्या नुतनीकरण कामांचे उपनगराध्यक्ष वैशाली दाभाडे यांच्या हस्ते रविवारी (दि.7) भूमिपूजन करण्यात आले. या नुतनीकरणासाठी 60 लाख 75 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती ज्येष्ठ नगरसेवक किशोर भेगडे आणि वार्ड क्रमांक 13 च्या नगरसेविका मंगल भेगडे यांनी दिली.

नुतनीकरणाचे काम नगरपरिषदेच्या नगरोत्थान फंडामधून करण्यात येत आहे.

यावेळी नगरसेवक अरुण माने, माजी नगरसेवक अयुब शिकीलकर, सूर्यकांत काळोखे, तळेगाव शहर राष्ट्रवादी महिला उपाध्यक्षा ज्योती शिंदे, भावना चव्हाण, सचिन भेगडे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती विशाल वाळुंज, चेतन भेगडे, शशिकांत हळदेंसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

प्रभाग क्रमांक 13 मधील उद्यानाच्या नुतनीकरणासाठी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक बापूसाहेब भेगडे व नगरसेविका मंगल भेगडे यांच्या विशेष प्रयत्नाने हा निधी प्राप्त झालेला आहे.

या नुतनीकरण कामात उद्यानात जाळी बसवणे, पेव्हर ब्लॉक बसवणे, नवीन लॉन्स टाकणे, समुद्रातील वाळू टाकणे, वॉचमनसाठी केबिन निर्माण करणे आदी कामांचा समावेश आहे.

हे उद्यान शहरातील सर्वांत मोठे आणि टिकाऊ विकासकाम असलेले असेल, असा दावा किशोर भेगडे यांनी याप्रसंगी केला.

ते म्हणाले, की कोणतेही काम जास्त कालावधीपर्यंत टिकेल अशा पद्धतीनेच करायचे की जेणेकरून त्याचा जास्तीत जास्त फायदा नागरिकांना होईल.

राव कॉलनीमधील नगरपरिषदेच्या मालकीच्या भूखंडावर अनेकांनी बापूसाहेब भेगडे यांना शाळा करावी असे सुचविले होते.

परंतु त्या ठिकाणी त्या कॉलनीतील नागरिकांचा हक्क असतो. त्यामुळे नागरिकांना उद्यान निर्माण करणे, समाज मंदिर निर्माण करणे हा दृष्टीकोन समोर ठेऊन बापूसाहेब भेगडे यांनी तळेगाव शहरात असलेल्या उद्यानामधून सर्वोत्तम उद्यान उभारले आहे.

गेल्या वीस वर्षांपासून या उद्यानाच्या कामाचा दर्जा उत्तम आहे, त्याच पद्धतीने दर्जेदार काम, नूतनीकरण करत असताना ठेकेदारांनी करावे अशा सूचना किशोर भेगडे यांनी केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.