Talegaon Dabhade : वीज बिलासाठी ग्राहकांना तीन महिने अवकाश द्या; भाजपचे महावितरणला निवेदन

एमपीसी न्यूज- कोरोना संकटसमयी आगामी 3 महिने वीजबिलासाठी ग्राहकांना अवकाश मिळावा तसेच वीजपुरवठा खंडीत केला जाऊ नये, याबाबत तळेगाव दाभाडे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने कनिष्ठ अभियंता एन. एस. धस यांना निवेदन देण्यात आले. 

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष‌ रवींद्र बाळासाहेब माने, कार्याध्यक्ष महेंद्र पळसे, सदस्य सतीश राऊत, विनायक भेगडे, रवींद्र भोसले उपस्थित होते.

यासंदर्भात बोलताना कनिष्ठ अभियंता धस यांनी वीजबिल संदर्भात कुठलाही तगादा ग्राहकांना लावला जाणार नाही, असे आश्वासन दिले. तसेच अपुऱ्या कामगारांच्या संख्येअभावी वीज सेवेबाबत अडथळा आल्यास नागरिकांनी आमच्या अडचणी समजून घेऊन सहकार्य करावे, असे आवाहनही धस यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.