Talegaon Dabhade: मंदिरे खुली करण्यासाठी भाजपच्या वतीने घंटानाद आंदोलन

भाजप महाराष्ट्र प्रदेश आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या आवाहनानुसार हे आंदोलन करण्यात आले.

एमपीसी न्यूज- मंदिरे खुली करावीत या मागणीसाठी शनिवारी (दि.२९) ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिर येथे भाजपच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. भाजप महाराष्ट्र प्रदेश आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या आवाहनानुसार हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, कार्याध्यक्ष महेंद्र पळसे, गटनेते अमोल शेटे, नगरसेविका शोभा भेगडे, माजी सभापती राजेश सरोदे, सरचिटणीस विनायक भेगडे, रवींद्र भोसले, उपाध्यक्ष विनोद भेगडे, भाजयुमो अध्यक्ष अक्षय भेगडे, माजी अध्यक्ष अरुण भेगडे, चिटणीस महावीर कणमुसे, अ‍ॅड. प्रज्ञा भिडे, रमाकांत कवितके आदि उपस्थित होते.

कुंभकर्णापेक्षाही गाढ झोपलेल्या ठाकरे सरकारला इशारा देण्यासाठी हे घंटानाद आंदोलन तळेगाव शहर भाजपच्या वतीने करण्यात आल्याचे तळेगाव शहर भाजपचे अध्यक्ष रवींद्र माने यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.