Talegaon Dabhade: दूध दरासाठी भाजपचे तहसिलदारांना निवेदन

Talegaon Dabhade: BJP's statement to tehsildar for milk price दूध व्यवसायाला 30 रुपये खरेदी भाव, भुकटीला प्रतिकिलो 50 रुपये अनुदान आणि गाईच्या दुधाला प्रतिलीटर 10 रुपये अनुदान देण्याची मागणी यात करण्यात आली आहे.

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे शहर भाजपच्यावतीने आज (दि.20) तहसिलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसह संकटात सापडलेल्या दूध व्यवसायाला 30 रुपये खरेदी भाव, भुकटीला प्रतिकिलो 50 रुपये अनुदान आणि गाईच्या दुधाला प्रतिलीटर 10 रुपये अनुदान देण्याची मागणी यात करण्यात आली आहे. तहसीलदार मधुसुदन बर्गे यांना भाजप कार्यकर्त्यांनी निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, बँकेकडून नाकारला जाणारा कर्जपुरवठा, बनावट बियाणांमुळे करावी लागणारी दुबार पेरणी, युरिया खताचा तुटवडा, काळाबाजार अतिवृष्टी व निसर्ग चक्रीवादळामुळे झालेले नुकसान यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

अशावेळी बुडत्याला काडीचा आधार असणारा दुग्धव्यवसाय संकटात आला आहे. दुधाचे भाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्याची स्थिती दयनीय झाली आहे. त्यामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांना भाववाढ करण्यासंदर्भात मावळ तहसिलदार मधुसुदन बर्गे यांना निवेदन आणि दूध बक्षीस देण्यात आले.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष रवींद्र माने, कार्याध्यक्ष महेंद्र पळसे, नगरपरिषद गटनेते अमोल शेटे, नगरसेविका शोभा भेगडे, महिला मोर्चा प्रदेश चिटणीस ज्योती जाधव, संघटन मंत्री-माजी नगरसेवक सचिन टकले, सरचिटणीस विनायक भेगडे, रजनी ठाकूर, महिला मोर्चा गाव अध्यक्षा मोहिनी भेगडे, स्टेशन कार्याध्यक्षा ॲड. तनुजा दाभाडे, भाजप शहर उपाध्यक्ष सचिन आरते, आशुतोष हेंन्द्रे, गणेश भेगडे, विनोद भेगडे, व्यापारी आघाडी अध्यक्ष निर्मल ओसवाल, कार्याध्यक्ष सागर शर्मा, सोशल मीडिया अध्यक्ष गौरव शहा, ओबीसी मोर्चा अध्यक्ष नितीन पोटे, कार्याध्यक्ष सचिन जाधव, ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी कार्याध्यक्ष अनिल वेदपाठक, उत्तर भारतीय आघाडी अध्यक्ष अरूण शुक्ला, तळेगाव भाजयुमोचे उपाध्यक्ष सागर भेगडे हे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.