Blood donation: स्वातंत्र्य दिनानिमित्त तळेगावातील मोहर प्रतिमा संकुलामध्ये रक्तदान शिबीर

एमपीसी न्यूज :  मोहर प्रतिमा सोसायटी तळेगाव दाभाडे राव कॉलनी येथे 75 व्या अमृतमोहत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त सोमवारी (दि.15) सकाळी  9 वाजता ध्वजारोहणचा कार्यक्रम तसेच रक्तदान शिबीर ही पार पडले.

यावेळी पोलीस नाईक गणेश शिंदे व जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक बाळासाहेब जांभुळकर यांच्या हस्ते ध्वजा रोहण करण्यात आले. तसेच मोहर प्रतिमा सोसायटी व पिंपरी-चिंचवड ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबीराचे उदघाटन तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्ष नितीन लांडगे व सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत आरदवाड यांच्या हस्ते कारण्यात आले.(Blood donation) गणेश भोसले यांच्या प्रयत्नातुन या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

Natyachata Spardha: असमाधानी कलाकाराकडूनच नाविन्यपूर्ण कलाकृती शक्य : ल. म. कडू

सदर शिबिरामध्ये 58 रक्तदात्यांनी रक्तदान केले या सामाजिक उपक्रमामुळे मोहर प्रतिमा सोसायटीने एक सामाजिक बांधिलकी जपत आदर्श निर्माण केला.(Blood donation) त्यानंतर बाळगोपाळांनी विविध सार्वजनिक कार्यक्रम सादर करून सर्वांची मने  जिंकली. मोहर प्रतिमा सोसायटी संकुलवासियांच्या वतीने व पदाधिकाऱ्याच्या वतीने आलेल्या सर्वांचे स्वागत व अभार मानण्यात आले व सुत्रसंचलन निखील कुलकर्णी यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.