Talegaon Dabhade: जायंट्स ग्रुप आयोजित शिबिरात 42 जणांचे रक्तदान

Talegaon Dabhade: Blood donation of 42 people in the camp organized by Giants Group

एमपीसी न्यूज – जायंट्स ग्रुप ऑफ  तळेगाव दाभाडे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शिबिरात 42 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्त संकलन करण्यासाठी गरवारे रक्तपेढी यांचे सहकार्य लाभले.

शिबिराचे उद्घाटन नगरसेवक निखिल भगत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जायंट्स अध्यक्ष हिरामण बोत्रे, युनिट संचालक अ‍ॅड. देविदास टिळे, प्रकल्प प्रमुख युवराज बडगुजर, संदीप गोंदेगावे,विराज कोळी, सुमित पारखी, वंदना कोळी,सुनील नकताळे, साखरे आदी उपस्थित होते.

जायंट्स ग्रुपच्या वतीने रक्तदात्यांना अर्सेनिक अल्बमच्या गोळ्या वितरीत करण्यात आल्या. हिरामण बोत्रे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like