Talegaon Dabhade : दुर्गप्रेमी ओंकार वर्तले लिखित ‘… मंदिरांच्या देशा’ या पुस्तकाचे प्रकाशन

एमपीसी न्यूज- दुर्गप्रेमी ओंकार वर्तले लिखित ‘… मंदिरांच्या देशा’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (दि. 17) ज्येष्ठ पत्रकार सुरेश साखवळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे तसेच नगरसेविका नीता काळोखे, माजी नगराध्यक्षा संगीता धोत्रे, माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके, महेंद्र पळसे, व्याख्याते डॉ. प्रमोद बोराडे, प्रकाशिका मनीषा खैरे,  श्री गणेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव वर्तले, सचिव दिलीप राजगुरव आदी उपस्थित होते.

“समाजाचे कल्याण व्हावे, हा साहित्याचा मुख्य हेतू असला पाहिजे. एका संस्कृत सुभाषितानुसार साहित्य, कला, संगीत यांत रमणाऱ्या माणसांना बुद्धिमान समजले जाते. ओंकार वर्तले यांचा पिंड सात्त्विक वृत्तीने लेखन करणाऱ्या साहित्यिकाचा असून त्यांच्या लिखाणातून साहित्य, संगीत, शिल्प या कलांची अनुभूती येते” असे विचार ज्येष्ठ पत्रकार सुरेश साखवळकर यांनी काढले.

ज्येष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे म्हणाले, “कवी गोविंदाग्रज यांनी महाराष्ट्राचे गुणवर्णन अनेक प्रकारे केले असून त्यापैकी ‘… भक्तीच्या देशा’ या वर्णनाचा प्रत्यय ओंकार वर्तले लिखित ‘… मंदिरांच्या देशा’ या पुस्तकातून येतो. महाराष्ट्रातील मंदिरे ही समाजमंदिरे झालेली दिसून येतात. सामाजिक अभिसरणात मंदिरांचा खूप मोठा वाटा आहे ”

ओंकार वर्तले म्हणाले, “मी हा आयुष्यातील आनंदाचा क्षण मानतो; कारण सुमारे एकतीस वर्षांपूर्वी गणेश प्रतिष्ठानची स्थापना झाली आणि अगदी बालपणापासूनच मला या प्रतिष्ठानच्या माध्यमातून ऊर्जा मिळत गेली. घरातून सुसंस्कारांचा वारसा मिळाला, त्यामुळे हातून थोडेबहुत लिखाण झाले”

नीला केसकर यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.