BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : ‘महाराष्ट्रातील प्राचीन व अपरिचित मंदिरांची सफर… मंदिरांच्या देशा’ पुस्तकाचे रविवारी ‘ प्रकाशन

71
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – तळेगाव-दाभाडे येथील दुर्गप्रेमी आणि गिर्यारोहक ओंकार वर्तले लिखित ‘महाराष्ट्रातील प्राचीन व अपरिचित मंदिरांची सफर… मंदिरांच्या देशा’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (दि. 17) ज्येष्ठ पत्रकार सुरेश साखवळकर आणि व्याख्याते, विचारवंत राजेंद्र घावटे यांच्या हस्ते होणार आहे.

तळेगाव येथील श्री गणेश मंदिर प्रांगण, राजगुरव कालनी, तळेगाव स्टेशन येथे सायंकाळी साडेसहा वाजता प्रकाशन समारंभ होणार आहे. या कार्यक्रमास तळेगाव नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके आणि नगरसेवक संतोष भेगडे यांची प्रमुख उपस्थिती राहील.

ओंकार वर्तले यांची यापूर्वी ‘सह्याद्रीतील ऑफबीट भटकंती’ आणि ‘आडवाटेवरची भटकंती’ ही दोन पुस्तके प्रकाशित झालेली असून दोन्हीही पुस्तकांना रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3