Talegaon-Dabhade : आईचे दूध बाळासाठी अमृत 

एमपीसी न्युज : आईचे दूध हे बाळासाठी अमृत असते, असे मत इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या अध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी व्यक्त केले.(Talegaon- Dabhade) स्तनपान सप्ताह निमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘स्तनपान समज गैरसमज’ या विषयी मार्गदर्शन पर मुलाखतीच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना त्या बोलत होत्या. हा कार्यक्रम तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात पार पडला.

 

प्रोजेक्ट चेअरमन रेडिओलॉजिस्ट डॉ दीपाली झंवर यांनी स्तनपान समज व गैरसमज या विषयावर स्त्रीरोग तज्ञ डॉ राणी बच्चे, डॉ रेणुका पारवे व आयुर्वेद डॉ लता पुणे यांची मुलाखत घेतली. गर्भवतींच्या मनातल्या अनेक शंकाकुशंकांचे उत्तम निरसन या मुलाखती द्वारे झाले. स्तनपानाचे फायदे डॉ राणी बच्चे यांनी अतिशय उत्तम उदाहरणे देऊन दिली.

 

डॉ रेणुका पारवे यांनी स्तनपान कसे करावे या विषयी मार्गदर्शन केले. (Talegaon-Dabhade)डाॅ लता पुणे यांनी आयुर्वेदातील स्तनपानाचे महत्व या विषयी सांगितले.उपस्थित गर्भवती महिलांना शतावरी कल्पचे वाटप डॉ दीपाली झंवर यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाला प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ गुट्टे,डॉ मोहिते,डॉ महालिंगे,डॉ मोनिका भेगडे,डॉ अनिता राजाध्यक्षा,डॉ ऐश्वर्या ठोंबरे यांनी सहकार्य केले.

Maval MNS : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका मनसे पूर्ण ताकतीने लढणार

 

क्लबच्या डॉ लीना कवितके,डॉ क्रांती इंगळे,सचिव निशा पवार,आयएसओ अर्चना देशमुख,क्लब करसपॉंडट जयश्री दाभाडे,अर्चना पिंपळखरे,भाग्यश्री काळेबाग,सानिका पाटील,ज्योती जाधव, रेणुका जाधव,ज्योती पाटील व गर्भवती महिला व इतर महिला वर्ग उपस्थित होत्या. प्रास्ताविक क्लबच्या अध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी केले तर आभार निशा पवार यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.