Talegaon Dabhade: बंटी भेगडे युवा मंचतर्फे मोफत भाजीपाला व अर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप

Talegaon Dabhade: Bunty Bhegade Youth Forum distributes vegetables to 700 families and arsenic album 30 tablets to 1500 families

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील विनोद (बंटीदादा) भेगडे युवा मंचच्या वतीने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  700 कुटुंबाना भाजीपाला स्वरूपात मदतीचा हात देण्यात आला. तसेच केंद्र सरकारच्या आयुष विभागाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होमिओपॅथिक मेडिसिन इम्युनिटी बूस्टर म्हणून सुचविले आहे त्या अनुषंगाने सोमवार (दि 8 मे) रोजी अर्सेनिक अल्बम 30  होमिओपॅथीक गोळयांचे मोफत वाटप करण्यात आले.

तळेगाव दाभाडेतील ज्ञानेश्वर नगर, गणेश काॅलनी, डोळसनाथ काॅलनी, माळी आळी, डोळसनाथ आळी, कुंभार वाडा,  भेगडे आळी, राजवाडा परिसरातील 1500 कुटुंबाना  या औषधाचे वाटप करण्यात आले.

 हे वाटप करत असताना लोकांना घरोघरी जाऊन कोरोना विषयी  जनजागृती करण्यात आली व माहिती पत्रक वाटप करुन आरोग्याविषयी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.