Talegaon Dabhade : घरफोडी करून दागिने आणि मूर्ती पळवल्या

एमपीसी न्यूज – घरफोडी चोरी करून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि मूर्ती असा एकूण 73 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 16) दुपारी एकच्या सुमारास कडोलकर कॉलनी येथे घडली.

मृणाल संतोष भोसले (वय 35, रा. कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृणाल यांचे घर मंगळवारी दुपारी कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी-कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. घरातून 60 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि मूर्ती असा एकूण 73 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला. मृणाल दुपारी दोनच्या सुमारास घरी आल्या असता हा प्रकार उघडकीस आला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.