Talegaon Dabhade : अमेरिकन डॉलरसह चोरट्यांनी पळवला हजारोंचा ऐवज

एमपीसी न्यूज – खिडकीचे गज कापून घरात आलेल्या चोरट्यांनी घरातून अमेरिकन डॉलरसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 63 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 21) सायंकाळी तळेगाव दाभाडे येथे घडली.

विक्रम महेश नरवडे (वय 34, रा. अमेय बंगला, चाकण रोड, तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी सहा ते रात्री 12 या कालावधीत फिर्यादी विक्रम यांचा अमेय बंगला बंद होता. अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या खिडकीचे गज कापून बंगल्यात प्रवेश केला. बंगल्यातील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि अमेरिकन डॉलर असा एकूण 63 हजार 400 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.