Talegaon Dabhade: उद्योगपती शैलेश शहा उद्या सांगणार संकटकाळातील यशाचा मंत्र

talegaon dabhade Businessman Shailesh Shah will recite the mantra of success in times of crisis on facebook live

एमपीसी न्यूज– लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळली असून कोट्यवधी लोक बेरोजगार झाले आहेत. उद्योजक आणि व्यापारी देखील हवालदिल झाले आहेत. त्यात तरुणांची संख्या मोठी आहे. अशा संकटकाळात त्यांना व्यवसायाबद्दल यशाचा मंत्र सांगण्यासाठी रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेने अनोख्या उपक्रमाचे नियोजन केले आहे. पुण्यातील ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक शैलेश शहा यांची मुलाखत रविवारी (दि.31) रोजी सकाळी 11 वाजता फेसबुक लाईव्हवर प्रसारित होणार आहे. याबाबत रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष रो. शंकर जाधव यांनी माहिती दिली.

ही मुलाखत नापासांची शाळाचे अध्यक्ष प्रा नितीन फाकटकर घेणार आहेत. त्याचबरोबर आपल्या व्यवसायातील जीवन प्रवास, व्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणी व त्यावर कशाप्रकारे मात करून आपण आपल्या व्यवसायात यशस्वी होऊ याबद्दल शैलेश शहा यांचे मत तरुणांना ऐकण्यास मिळणार आहे.

ही मुलाखत प्रत्येकाने पहावी, असे आवाहनही रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.