Talegaon Dabhade : श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे पार्थ पवार यांच्या हस्ते प्रकाशन

एमपीसी न्यूज- श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार व युवा नेते पार्थ पवार यांच्या हस्ते करण्यात आले. मावळ तालुक्यात कार्यरत असलेल्या श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने दरवर्षी दिनदर्शिकेचे प्रकाशन होत असते.

_MPC_DIR_MPU_II

तळेगाव दाभाडे येथे रविवारी पार्थ पवार यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमाला पतसंस्थेचे संस्थापक बबनराव भेगडे ,संत तुकाराम सहकारी साखर कारखाना उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, नगरसेवक संतोष भेगडे, अभिषेक बोके, युवक जिल्हा अध्यक्ष सचिन घोटकूले, पुणे जिल्हा बँक उपाध्यक्षा अर्चना घारे, संचालक अंकुश आंबेकर, पतसंस्थेचे अध्यक्ष शरद भोंगाडे, उपाध्यक्ष राहुल पारगे, सचिव सतीश भेगडे, खजिनदार निलेश राक्षे, अतुल राऊत आणि संचालक उपस्थित होते.

पार्थ पवार यांनी याप्रसंगी पतसंस्थेच्या अहवालाचा आढावा घेत आर्थिक मंदीच्या काळात संस्थेची स्थिती उत्तम असल्याबद्दल कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.