Talegaon Dabhade : डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचेे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आले.

यावेळी पतसंस्थेचे संस्थापक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बबनराव भेगडे, तळेगाव नगरपरिषदेचे नगरसेवक, संस्थेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक संतोष भेगडे, नगरसेवक अरुण माने, संस्थेचे अध्यक्ष शरद भोंगाडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक अंकुश आंबेकर, ज्येष्ठ नेते सुभाष जाधव, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, शंकर भेगडे, शंकर वाजे, अरविंद गद्रे, समीर भेगडे, उपाध्यक्ष राहुल पारगे आदी यावेळी उपस्थित होते.

डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने दरवर्षी अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. मकरसंक्रातीला महिलांसाठी हळदी कुंकुवाचा कार्यक्रम आयोजित करून आकर्षक भेटवस्तू दिली जाते. मे महिन्यात ग्राहक मेळावा, जून महिन्यात शालेय विद्यार्थ्यांसाठी सायकल आणि गणवेश वाटप, गणेशोत्सवात अथर्वशीर्ष पठण, दिवाळीला दीपोत्सव तसेच वैद्यकीय मदत असे विविध कार्यक्रम घेतले जातात. छोट्या उद्योग व्यावसायिकांना उद्योग- व्यवसाय वाढीसाठी कर्ज पुरवठा उपलब्ध करून दिला जातो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.