Talegaon Dabhade : भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त जन्म कल्याणक कार्यक्रम रद्द करून शिधा वाटप

एमपीसी न्यूज – अहिंसेचे पुजारी श्री भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक दिनाचे औचित्य साधून कोरोना या महामारीमुळे संपूर्ण देशावर जे संकट ओढवले आहे. त्यासाठी भगवान महावीर जन्म कल्याणक कार्यक्रम रद्द करून तळेगाव सकल जैन समाजाच्या वतीने 500 किलो तांदूळ,500 किलो आटा, 250 किलो तूर डाळ ,250 किलो तेल आणि गुळ या कोरड्या शिध्याचे वाटप राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विठ्ठल मंदिर संस्थान यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

आचार्य अक्षय बोधी गुरुमहाराज यांच्या उपस्थितीत जैन मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जैन मंदिराचे विश्वस्त अशोक ओसवाल, विनोद राठोड, नितीन शहा, सुरेशभाई दोशी व मंदिर जीर्णोद्धार समितीचे विश्वस्त प्रकाश ओसवाल, भवरमल संघवी,संजय ओसवाल, हेमंत सोलंकी ,संजय मेहता, संजय पटवा आदी उपस्थित होते

जैन समाज ज्यावेळी देशावर संकट येते त्यावेळी सर्वात पुढे मदतीसाठी धावून येतो, असे प्रतिपादन आचार्य अक्षय बोधी गुरु महाराज यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन किरण ओसवाल, जितेंद्र जैन, निर्मल ओसवाल, शांतीलाल ओसवाल व समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.