Talegaon Dabhade: ‘करीअर जत्रा’ला पहिल्याच दिवशी 10 हजार विद्यार्थ्यांची भेट

एमपीसी न्यूज – मावळ तालुका एज्युकेशन हब म्हणून उदयास येत असून चारित्र्यसंपन्न विद्यार्थी आणि सुसंस्कारित पिढी ही देशाची संपत्ती आहे. बदलत्या काळात विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी ‘करीअर जत्रा’ सारखे उपक्रम नक्कीच मार्गदर्शक ठरतील, असे प्रतिपादन माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी केले.

आमदार बाळा भेगडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील नगरपरिषदेच्या थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळेच्या प्रांगणात आयोजित केलेल्या’करीअरची जत्रा’ या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी आमदार संजय भेगडे,उद्योजक रामदास काकडे,नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे, पंचायत समितीचे सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम,ज्येष्ठ नेते गणेश भेगडे,शंकरराव शेलार,प्रशांत ढोरे, सुकन बाफना, अविनाश बवरे,चंद्रकांत शेटे,राजाराम शिंदे,संतोष दाभाडे पाटील,रवींद्र आवारे,अरुण भेगडे पाटील,राजू मु-हे, लक्ष्मण माने ,सुनंदा भोसले,डॉ.ताराचंद कराळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

रामदास काकडे म्हणाले,तरुण हे भारताचे आशास्थान आहे.करिअरची जत्रा हा स्तुत्य उपक्रम विद्यार्थी आणि पालकांना उपयुक्त आहे.अशा प्रकारचा उपक्रम राबविणारा मावळ तालुका हा राज्यातील  पहिलाच तालुका ठरला आहे.आशिया खंडात तळेगावची एमआयडीसी सर्वात मोठी असून कुशल कामगारांना चांगली संधी आहे.बाळा भेगडे म्हणाले,दहावी-बारावीनंतर  आपल्या पाल्यांना योग्य क्षेत्र निवडता यावे हा करिअर जत्रेचा मुख्य उद्देश असून पालकांनी पाल्यावर अपेक्षाचे ओझे लादू नये.त्यांना त्यांच्या आवडीचे क्षेत्र निवडू द्यावे.

यावेळी प्रा.विजय नवले यांनीही मनोगत व्यक्त केले.स्वागत गणेश भेगडे यांनी केले.प्रास्तविक प्रा.नितीन फाकटकर यांनी केले.ग्रामीण भागातील शैक्षणिक क्रांतीची ही चाहूल असल्याचे फाकटकर यांनी प्रास्ताविकात सांगितले.सूत्रसंचालन सुनील भेगडे आणि यदुनाथ चोरगे यांनी केले. भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विनायक भेगडे यांनी आभार मानले.

विविध प्रकारच्या कोर्सेसचेस्थानिक तसेच राज्यातील  नामांकित संस्थाचे 130 या स्टोल या करिअर जत्रेत सहभागी झाले होते.पहिल्याच दिवशी
विद्यार्थी आणि पालकांनी मोठी गर्दी केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.