Talegaon Dabhade : सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळेसह आवारात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत; पोलिसांचे शाळा, महाविद्यालयाला आवाहन

एमपीसी न्यूज – हैदराबाद येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील सर्व शाळा, कॉलेज, मुख्याध्यापक यांची बैठक बुधवार (दि. 04) 11:30 वाजता घेण्यात आली घेण्यात आली. यावेळी पोलिसांच्या वतीने आवश्यक सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळेसह आवारात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, असे आवाहन केले आहे.

या मीटिंगमध्ये तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी हैदराबाद येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यक्षेत्रातील सर्व प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा व महाविद्यालयातील मुख्याध्यापक, प्राचार्य यांची सहविचार सभा, तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन येथे बुधवारी ( दि. 4) दु. 11.30 ते 12.45 वा दरम्यान पार पडली.

या बैठकीत सर्व व मुख्याध्यापक व प्राचार्य यांना मार्गदर्शन केले. आपल्या शाळेमध्ये योग्य अशी खबरदारी घेण्यास सांगितले. तसेच जास्तीत जास्त सीसीटीव्ही कॅमेरे शाळेच्या आवारात आणि शाळेच्या आवाराच्या बाहेर बसवावेत, अशा योग्य त्या सूचना देऊन सर्व मुख्याध्यापक व प्राचार्य यांना त्यांच्या अडीअडचणी विचारून त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले. सण व उत्सव काळात व आंदोलन काळात पोलीस प्रशासनाला कायदा-सुव्यवस्था राखणे कामी सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.