Talegaon Dabhade : कांतीलाल शाह विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात

एमपीसी न्यूज – स्टेशन परिसरातील कांतीलाल शाह विद्यालयाचे स्नेहसंमेलन गुरूवारी (दि.26) उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर केले. यावेळी ‘जीवनमूल्य’ या कल्पनेवर आधारित विद्यार्थ्यांनी नृत्ये सादर केली. शाळेच्या शिक्षक, विद्यार्थी, पालक यांचे सहकार्याने पुरग्रस्तांना मदत, माळेगाव येथील विद्यार्थ्यांना पुस्तके व पेट्या वाटप आदी घटनावर आधारीत सादरीकरण करण्यात आले.

यावेळी आमदार सुनील शेळके, संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे, संस्थेचे कार्यवाह रामदास काकडे, खजिनदार चंद्रकांत शेटे विद्यालयाचे चेअरमन शैलेश शाह, महेश शाह, डाॅ.शाळीग्राम भंडारी, अॅड.श्रीराम कुबेर, डाॅ.किरण देशमुख, यशवंत पाटील,नम्रता शाह, शर्मिला शाह, डॉ.लीना कश्यप आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आमदार सुनील शेळके यांनी मनोगतात सांगितले कि, या विद्यालयातील शिक्षक विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिक्षण देतात. त्यामुळे निकालाची परंपरा उत्तम आहे. विद्यार्थ्यांना व शाळेला काही मदत लागली तर मी करणेस तयार आहे.

कार्तिकेय सातकर व मीमांशा कथायत यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका सुमन रावत, वैशाली शिंदे, स्मिता पेंडुरकर, शितल पवार अर्चना चव्हाण सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. रुपाली अगरवाल यांनी आभार मानले.

HB_POST_END_FTR-A2
You might also like