Talegaon Dabhade : पादचारी महिलेचे गंठण हिसकावले

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी चालत जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे सोन्याचे गंठण दोन अनोळखी चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 26) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास यशवंत नगर, तळेगाव दाभाडे येथे घडली.

सोनाबाई महादू घिगे (वय 54, रा. यशवंत नगर, तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास फिर्यादी सोनाबाई यशवंत नगर येथून रस्त्याने पायी चालत जात होत्या. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे 35 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसकावून नेले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.