Talegaon Dabhade : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – भाजी खरेदी करून घरी जात असणार्‍या पादचारी महिलेचे दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी चार तोळे वजनाचे मंगळसूत्र हिसकावले. ही घटना रविवारी (दि. 2) सायंकाळी साडेसातच्या सुमारास सरस्वती शाळेच्या मागे यशवंतनगर, तळेगाव दाभाडे येथे घडली.

सोनाली मराठे (वय 33) यांनी या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठे रविवारी सायंकाळी भाजी खरेदी करण्यासाठी बाजारात गेल्या. भाजी खरेदी करून त्या पायी येत होत्या. त्या सरस्वती शाळेच्या मागे यशवंतनगर येथे आल्या असता दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातून चार तोळे वजनाचे 92 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.