Talegaon Dabhade : माळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी चंद्रकांत दाभाडे यांची बिनविरोध निवड

एमपीसी न्यूज- माळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी चंद्रकांत निवृत्ती दाभाडे यांची बिनविरोध निवड झाली. चंद्रकांत दाभाडे हे पुढारी ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असून या आधीच्या कालखंडात त्यांनी उपसरपंच म्हणूनही यशस्वी काम केलेले आहे.

यापूर्वीचे सरपंच बाळासाहेब भोंगाडे यांनी कार्यकाल संपल्याने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली. चंद्रकांत दाभाडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी बजरंग मेकाले यांनी जाहीर केले. यावेळी उपसरपंच पूनम आल्हाट, माजी सरपंच गणेश दाभाडे, सदस्य सुनील दाभाडे, गणेश माळी, वैशाली शेलार, रजनी दाभाडे, जयश्री गोठे, राजश्री तळपे उपस्थित होते.

चंद्रकांत दाभाडे हे पुढारी ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असून या आधीच्या कालखंडात त्यांनी उपसरपंच म्हणूनही यशस्वी काम केलेले आहे. आगामी काळात गावातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण, बंदिस्त गटार, शुद्ध पाणी पुरवठा आणि स्वच्छता व प्लास्टिक मुक्त ग्रामपंचायत यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.