Talegaon Dabhade : चौकटींच्या पलीकडचे अंतर-बाह्य निर्मळ व्यक्तिमत्व चंद्रकांत शेटे – रामदास काकडे

एमपीसी न्यूज – इंद्रायणी विद्या मंदिर,नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ,स्नेहवर्धक मंडळ अशा संस्थात्मक चौकटींच्या पलीकडचे सबाह्य एकच आणि निर्मळ असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे चंद्रकांत शेटे आहेत.नोकरीनंतर आपले उर्वरित आयुष्य समाजसेवेला वाहून घेत (Talegaon Dabhade) त्यांनी एकनिष्ठ राजकारण आणि समाजकारणाचा आदर्श वस्तुपाठ उभा केल्याचे गौरवोद्गार इंद्रायणी विद्या मंदीर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी काढले.इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांच्या अभिष्टचिंतन सोहळयात अध्यक्ष म्हणून काकडे बोलत होते.

याप्रसंगी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे खजिनदार शैलेशभाई शहा, विश्वस्त संजय साने, विलास काळोखे,संदीप काकडे,युवराज काकडे,परेश पारेख,  नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव नंदकुमार शेलार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संभाजी मलघे,डाॅ संजय आरोटे,जी एस शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना काकडे पुढे म्हणाले की, कोणताही कार्यकर्ता एका दिवसात घडत नाही त्यामागे अनेक कष्ट आणि साधना असते.शेटे साहेब त्याचे उत्तम उदाहरण आहेत. (Talegaon Dabhade) म्हणूनच आजही पक्षीय राजकारणात त्यांच्या शब्दाला मोठी किंमत आहे.

Pune Breaking News : एकाच कुटुंबातील 7 जणांचे सापडले मृतदेह; आत्महत्या की घातपात?

आणीबाणीच्या काळात पक्षाचे काम करताना एकोणीस महिने तुरुंगात काढलेले शेटे साहेब हे आदर्श राजकारणी तर आहेतच पण उत्कृष्ट बँकर, कुटुंबवत्सल कुटुंबप्रमुख, उत्कृष्ट प्रशासक,उत्तम व्यवस्थापन तज्ज्ञ, प्रश्नांची जाण असलेलं अभ्यासू व्यक्तिमत्त्व असे चंद्रकांत शेटे यांच्या जगण्याचे अनेक पदर काकडे यांनी उलगडून दाखवले.

संस्थेच्या रचनात्मक पातळीवर वाद आणि दुफळी यांना कसे टाळता येईल आणि पदाधिकाऱ्यांच्या एकसंध असण्यातून संस्था कशी पुढे नेता येईल याच ध्यासाने प्रेरित शेटे साहेबांचा आदर्श प्रत्येकाने घ्यायला हवा असे रामदासजी काकडे म्हणाले.

सत्काराला उत्तर देताना चंद्रकांत शेटे म्हणाले की,प्रामाणिकपणे कष्ट केल्यास यश हमखास मिळते. आजपर्यंत ज्या वेगाने इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेची प्रगती व्हायला हवी (Talegaon Dabhade) होती ती काही अडचणींमुळे होऊ शकली नाही मात्र इथून पुढे आपणा सर्वांना या प्रगतीसाठी अहोरात्र झटायचे असल्याचा संकल्प त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला.

आदरणीय कृष्णराव भेगडे, नथुभाऊ भेगडे पाटील, केशराव वाडेकर या पूर्वसूरींच्या प्रेरणेने मी काम करत असल्याचा अभिमान वाटतो असे शेटे म्हणाले.पुढे बोलताना शेटे म्हणाले की,उत्तम आरोग्य ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे.सर्वांनी आपल्या उत्तम आरोग्यासाठी प्राणायाम,योग्य आहार-विहार यांचे नियमन करावे असा वडीलकीचा सल्लाही यावेळी त्यांनी दिला.

यावेळी संदीप काकडे, नंदकुमार शेलार, परेश पारेख यांनी मनोगतातून शुभेच्छा व्यक्त केल्या.प्रास्ताविक शैलेशभाई शहा यांनी केले. तर आभार महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ संभाजी मलघे यांनी मानले आणि सूत्रसंचालन दिप्ती कन्हेरीकर व प्रा. संदीप भोसले यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.