BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : बालरोग चिकित्सा शिबिरात १३३ बालकांची तपासणी 

एमपीसी न्यूज- माईर्स एमआयटी संचलित एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय डॉ.भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय तळेगाव दाभाडे तर्फे बालरोग  निदान व उपचार शिबिर संपन्न झाले. १३३ हून अधिक बालकांची तपासणी करण्यात आली.
या शिबिरामध्ये महाविद्यालयाचे बालरोग विभागाचे  डॉ. विजय भवारी, डाॅ. ऐरीक डिसाेझा तसेच अन्य सहकारी डॉक्टरांच्या  मार्फत  १३३ हून अधिक  रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात तज्ञ डॉक्टरांचा मोफत सल्ला व तपासणी, तसेच  नियमीत चाचण्या व मोफत औषधोपचार देण्यात आले.
शिबिरामध्ये पुढील ७ दिवस माईर्स भौतिकोपचार महाविद्यालयाच्या वतीने मोफत भौतिकोपचार देण्यात येतील. रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी राहण्याचा  खर्च  मोफत असेल अशी माहिती महाविद्यालयाच्या विश्वस्त व कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा नागरे यांनी दिली.
HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3