Talegaon Dabhade: तळेगावमध्ये लॉकडाऊनला नागरिकांचा प्रतिसाद

Talegaon Dabhade: Citizens respond to lockdown in Talegaon मुख्य रस्त्यावर फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहने धावताना दिसत होती. सर्वच दुकाने बंद असल्याने तळेगाव शहरासह मुख्य चौक आणि बाजारपेठेत मागील दोन दिवसांपासून शुकशुकाट आहे.

एमपीसी न्यूज- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा बसवण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने पुकारलेल्या लॉकडाऊनला तळेगाव दाभाडेमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मागील दोन दिवसांत अत्यावश्यक सेवेतील औषधांची दुकाने, रुग्णालये आणि दूध वितरण वगळता तळेगाव शहर शंभर टक्के बंद होते.

लॉकडाऊन काळात बँका आणि शासकीय कार्यालये चालू आहेत. मात्र, तिथे ग्राहकांना परवानगी नसल्याने एरवी गर्दी असलेल्या या ठिकाणांवर शांतता आहे.

सोमाटणे फाटा, लिंब फाटा, तळेगाव स्टेशन चौक या ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आले असून प्रत्येकाची कसून चौकशी करण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मुख्य रस्त्यावर फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहने धावताना दिसत होती. सर्वच दुकाने बंद असल्याने तळेगाव शहरासह मुख्य चौक आणि बाजारपेठेत मागील दोन दिवसांपासून शुकशुकाट आहे.

दरम्यान, नवलाख उंब्रे, आंबी, वराळे, माळवाडी आणि इंदोरी येथेही लॉकडाऊनला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. इंदोरीमधील मुख्य बाजारपेठसह शहरात शांतता पाहावयास मिळाली. फक्त अत्यावश्यक सेवेतील दवाखाने आणि औषधांची दुकाने चालू होती.

इंदोरी बायपास आणि आंबी चौक येथे या ठिकाणी चेक पोस्ट उभारले आहेत. तळेगाव एमआयडीसीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.