Talegaon Dabhade: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे शहर आरोग्य सुरक्षा समितीची स्थापना

एमपीसी न्यूज – कोरोना रोगाचा संसर्ग रोखण्याच्या पार्श्वभूमीवर ‘तळेगाव दाभाडे शहर आरोग्य सुरक्षा समिती’ स्थापन करण्यात आली असल्याची माहिती संतोष दाभाडे पाटील व सभागृह नेते अमोल शेटे यांनी दिली.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये दि. ९ रोजी झालेल्या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला. या समितीने पुढील काळात तळेगाव शहरांमध्ये कोरोनाच्या संदर्भात होणाऱ्या देश पातळीवरील , राज्यपातळीवरील निर्णयाची तळेगाव दाभाडे शहर स्थानिक पातळीवर यासंदर्भात निर्णय व अंमलबजावणी करण्याकरिता ही समिती गठीत केलेली आहे. समितीमधील सदस्य पुढील प्रमाणे आहेत.

तळेगाव दाभाडे शहर आरोग्य सुरक्षा समिती सदस्य – सत्येंद्रराजे दाभाडे (सरकार), मुख्याधिकारी दीपक झिंजाड (प्रशासकीय प्रमुख), किशोर आवारे, संतोष दाभाडे पाटील, गणेश खांडगे, अमोल शेटे, गणेश काकडे, संतोष छ. भेगडे, अरुण ज.भेगडे पाटील, सुशील सैंदाणे, प्राथमिक आरोग्य केंद्र प्रमुख डॉ . प्रवीण कानडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, हे सदस्य असून यामध्ये कार्यकारी संस्था म्हणून विठ्ठल मंदिर देवस्थान तळेगाव दाभाडे गांवभाग, विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट तळेगाव स्टेशन यांचे जबाबदारी राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.