Talegaon Dabhade : इंद्रायणी विद्या मंदिर केंद्रावर बारावीच्या परीक्षा शिस्तबद्ध पार पडल्या
केंद्र संचालकांनी मानले आभार

एमपीसी न्यूज – इयत्ता बारावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत पार पडल्या. तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्या मंदिर या केंद्रावर 2095 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. या केंद्रावर शिस्तबद्ध आणि यशस्वीपणे परीक्षा पार पडल्याबद्दल केंद्र संचालक प्रा. ए. आर. जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.
21 फेब्रुवारी ते दि 18 मार्च या कालावधीत झालेल्या एच.एस. सी.बोर्ड परीक्षा केंद्र क्रमांक 101 वर अतिशय शिस्तबद्ध व यशस्वीरित्या पार पडली.या परीक्षेसाठी सर्व उपकेंद्र संचालक,पर्यवेक्षक रनर,परीक्षा समिती सदस्य,सेवक वर्ग,कार्यालयीन कर्मचारी या सर्वांनी मोलाचे असे योगदान दिल्याबद्दल केंद्र संचालक जाधव यांनी त्यांचे आभार मानले.
तसेच ही परीक्षा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे सर्व पदाधिकारी या सर्वांचे मार्गदर्शन मिळाले याबद्दलही सर्वांचे आभार जाधव यांनी मानले.
परीक्षा परिरक्षक, त्यांचे कर्मचारी, पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले यांचेही मनःपूर्वक आभार केंद्र संचालक जाधव यांनी मानले.