BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : डोळसनाथ महाराज मंदिरात घुमले सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचे स्वर

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिरात सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भारतीय जनता युवा मोर्चा तळेगाव दाभाडे यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मानाच्या पहिल्या गणपती समोर हा कार्यक्रम झाला.

राजमाता जिजाऊ महिला मंच संस्थापक अध्यक्षा सारिका संजय भेगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी युवक अध्यक्ष अक्षय माधव भेगडे, कार्याध्यक्ष प्रशांत एकनाथ दाभाडे, नियोजन व व्यवस्था शुभम कुल, संदीप सावंत, योगेश भेगडे, आदित्य टकले, महिला अध्यक्ष अलकाताई भास्कर, कार्याध्यक्ष चारुशीला काटे, रजनीताई ठाकूर, ज्योती जाधव, अंजली जोगळेकर उपस्थित होते.

पाऊस असतानासुद्धा सुमारे दोन हजार महिलांनी अथर्वशीर्ष पठणामध्ये सहभाग नोंदवला. कार्यक्रमांमध्ये शहराध्यक्ष संतोष दाभाडे यांनी नामदार बाळा भेगडे यांच्या महिलांसाठीच्या सुरक्षा विमा योजनेची माहिती उपस्थितांना दिली. संघटन सरचिटणीस गौरव गुंड यांनी स्वागत केले. युवा अध्यक्ष अक्षय भेगडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

HB_POST_END_FTR-A2

.