BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : ‘आघाडी-बिघाडी’ या फेसबुक पेजविरोधात तक्रार दाखल

एमपीसी न्यूज- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षाच्या इतर ज्येष्ठ नेत्यांच्या विरोधात ‘आघाडी-बिघाडी’ या फेसबुक पेजवरुन जाणीवपूर्वक मोहीम राबवून त्यांची बदनामी करण्यात येत आहे असा आरोप करीत याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबतचे निवेदन मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोशल मीडिया अध्यक्ष संजय शेडगे यांनी पोलीस निरीक्षक अमर वाघमोडे यांना दिले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पेजवरुन अतिशय मानहानीकारक, खोटारडा आणि सभ्यतेच्या संकेताला हरताळ फासणारा मजकूर प्रकाशित करुन नेत्यांची बदनामी करण्यात येत आहे. सोशल मिडियात अशा प्रकारचे खोडसाळ कॅम्पेन राबवून पक्षाची आणि पक्षाच्या नेत्यांची प्रतिमा खराब करण्याचे प्रयत्न सातत्याने केले जात असून यावर वेळीच आवर घालण्यासाठी या पेजचे अॅडमिन आणि इतरांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी पुणे जिल्हा इंटक कामगाराचे अध्यक्ष विजय काळोखे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुनील भोंगाडे, तालुका सरचिटणीस सुदाम कदम व तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष आशिष खांडगे महेश मते उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like