Talegaon Dabhade: हिंदमाता भुयारी मार्गातील सांडपाण्याचा निचाऱ्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा – वैशाली दाभाडे

Talegaon Dabhade: Complete sewage drainage work in Hindmata subway before monsoon - Vaishali Dabhade

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील हिंदमाता भुयारी मार्गाच्या सांडपाण्याच्या निचऱ्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या मागणीचे निवेदन उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांना शनिवार (दि.9) रोजी देण्यात आले.

तळेगाव दाभाडे स्टेशन चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी गाव भागाला जवळचा मार्ग म्हणून हिंदमाता भुयारी पूल बांधण्यात आला. त्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. २०१९ च्या पावसाळ्यात वारंवार त्या पुलाचा स्विमिंग पूल होऊन पूल वाहतुकीसाठी वापरता आला नाही. या पुलाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने पावसाळ्यात लक्षद्वीप सोसायटीमध्ये पाणी घुसल्याने जयवंत देशपांडे, रतन चौटलिया अशा काहींच्या घरात पाणी घुसल्याने सीमा भिंती तोडाव्या लागल्या, त्यांचे आर्थिक नुकसान झाले. मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले.

  नागरिकांनी वारंवार मागणी करून या पुलाखाली पावसाचे पाणी साठते आहे. दुरुस्ती अभावी हा पूल अडगळीचा ठरला आहे. पावसाळ्यात हा पूल वाहतुकीसाठी वापरता येत नाही. पावसाळ्याच्या अगोदरच पुलाच्या खालील  पाण्याचा निचरा होण्यासाठी त्वरित काम पूर्ण करण्याची मागणी लेखी निवेदनातून करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.