Talegaon Dabhade: चीनशी लढताना शहीद झालेल्या भारतीय जवानांना काँग्रेसच्या वतीने श्रद्धांजली

Talegaon Dabhade: Congress pays homage to Indian soldiers who were martyred while fighting with China

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील मारुती मंदिर चौकात मावळ तालुका काँग्रेस कमिटी व तळेगाव शहर काँग्रेस कमिटीच्या संयुक्त विद्यमानाने भारत-चीन सीमेवर शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात  आली.

_MPC_DIR_MPU_II

 तळेगाव शहराध्यक्ष यादवेंद्र खळदे व संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक व ज्येष्ठ नेते  माऊली तथा ज्ञानेश्वर दाभाडे यांनी ही माहिती दिली.

याप्रसंगी माजी नगराध्यक्षा अंजलीराजे दाभाडे, मावळ तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब ढोरे,  शिक्षण मंडळाचे माजी सभापती  जयसिंग भालेराव, नगरसेवक निखिल कवीश्वर, जितेंद्र खळदे, राजू फलके, सतीश खळदे, उत्तम  ओसवाल, अशोक म्हाळसकर, विलास मालपोटे, राम शहाणे, अमोल दाभाडे, निनाद हरपुडे, प्रताप हुंडेकरी, सुधीर भोंगाडे, विजय काशीद, अश्विनी झगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक विशाल वाळुंज यांनी केले तर आभार नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.