Talegaon Dabhade : कोरोना काळातील फार्मसी क्षेत्राचे योगदान वाखाणण्याजोगे – चंद्रकांत शेटे

एमपीसी न्यूज : कोरोना काळात फार्मसी क्षेत्राचे (Talegaon Dabhade) योगदान व औषध निर्मात्यांनी आरोग्यदूत म्हणून केलेले काम हे वाखणण्यासारखे असल्याचे मत इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी व्यक्त केले. इंद्रायणी विद्यामंदिरच्या इंद्रायणी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या (डी. फार्म) शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ नुकताच पार पडला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शेटे बोलत होते. फार्मसी क्षेत्राचे महत्त्व विषद करत त्यांनी विद्यार्थ्यांना या क्षेत्रात भविष्यात मोठ्या संधी असून यात मोठे काम करता येणे शक्य असल्याचे म्हटले.

इंद्रायणी विद्यामंदिरच्या इंद्रायणी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी(डी.फार्म) यांचा शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ दि. 21 जानेवारी रोजी महाविद्यालयात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे होते.

या प्रसंगी संस्थेच्या विश्वस्त व फार्मसीच्या मार्गदर्शक निरूपा कानिटकर, स्किनोव्हेटचे मॅनेजर अमोल खेडकर, व्यागमाईन हेल्थ केअरचे झोनल फिल्ड मॅनेजर योगेश गाडे, डी फार्मसीचे प्राचार्य जी एस शिंदे, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे, फार्मसीचे (बी) प्राचार्य डॉ. संजय आरोटे, शिक्षक व शिक्षकेतर वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे म्हणाले की फार्मसी क्षेत्राचे महत्त्व तसेच विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील भविष्यातील संधी यात मोठे काम करता येणे शक्य आहे. कोरोना काळात फार्मसी क्षेत्राचे योगदान व औषध निर्मात्यांनी आरोग्यदूत म्हणून केलेले काम हे वाखणण्यासारखे आहे आणि यापुढेही त्याचा गौरव होत राहील.

आपल्यामध्ये उत्तमोत्तम आरोग्य सेवक निर्माण झाले पाहिजेत असे काम करण्यास आपणास भरपूर वाव असल्याचे मत शेटे यांनी यावेळी व्यक्त केले.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना संस्थेच्या विश्वस्त निरूपा कानिटकर (Talegaon Dabhade) यांनी संस्थेच्या प्रगतीचा चढता आलेख उपस्थितांना समजावून सांगितला. महाविद्यालयामधील शिक्षक,भौतिक सोयी सुविधांचा उपयोग विद्यार्थ्यांनी आपल्या उत्तम करिअरसाठी करून घ्यावा असे सांगत फार्मसी व्यवसाय हा मानवसेवा करणारा व्यवसाय असून रुग्णसेवा हीच मोठी सेवा असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी सदैव तत्पर असावे हा विद्यार्थ्यांना सल्ला दिला.

प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले अमोल खेडकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना फार्मसीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर भविष्यात सरकारी हॉस्पिटल, केमिकल इंडस्ट्री, अन्न व औषध प्रशासन इत्यादी क्षेत्रात उत्तमोत्तम संधी कशा मिळतात याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राध्यापक,ड्रग ईन्स्पेक्टर, क्वालिटी अशुरन्स म्हणून नोकरी करताना असलेली आव्हाने आणि त्यासाठीच्या क्षमतांचा आढावा घेतला.

तसेच योगेश गाडे यांनी विविध खाजगी कंपन्यांमध्ये मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करण्याच्या अनेक संधी उपलब्ध असतात त्यासाठी स्वतःचे नवीन प्रॉडक्ट तयार करून त्याचे उत्तम मार्केटिंग करताना आवश्यक असलेले कौशल्ये आणि पात्रता याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी फार्मसीचे प्राचार्य जी एस शिंदे यांनी केले.

Ravet : ट्रेडिंग अॅपमध्ये पैसे गुंतवणे पडले महागात; 12 लाखांची फसवणूक

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फार्मसी महाविद्यालयातील द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी वैभवी मराठी व गौरी मारणे यांनी केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. मृणाली काळे यांनी केले. या इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संभाजी मलघे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून मार्गदर्शन केले.

कार्यक्रमासाठी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी (Talegaon Dabhade) नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.