Talegaon Dabhade: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रशिक्षण व मार्गदर्शन

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे यांच्या पुढाकाराने तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कोरोना पार्श्वभूमीवर प्रशिक्षण आणि मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनीही यावेळी सर्वांना मार्गदर्शन केले.

प्रवेशाच्या वेळी विशेष करून सर्वांच्या हाताला सॅनिटायझर लावून कोरोनाविषयी जागरूकतेचा संदेश दिला जात होता. यावेळी रुग्णकल्याण समितीचे सदस्य, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, शहरी व ग्रामीण स्वयंसेविका, अंगणवाडी कार्यकर्ते आणि आरोग्य कर्मचारी यांना विशेष मार्गदर्शन आणि सूचना देण्यात आल्या. यामध्ये शहर व ग्रामीण भागामध्ये रस्त्यांवर आणि रोगराईच्या ठिकाणी औषधांची फवारणी केली जावी तसेच सर्व ग्रामपंचायतींना नागरिकांच्या घरी मोफत सॅनिटायझर देण्याचेही यावेळी सांगण्यात आले. आरोग्य केंद्रावरील एक कर्मचारी गाव व शहरी भागाजवळील टोलनाक्यांवर बाहेरून येणाऱ्या परदेशी व्यक्तींवर नजर ठेवण्यासाठी असावा आणि प्रत्येकाने स्वच्छतेचे पालन करणे आवश्यक असल्याचेही यावेळी मराठे यांनी विशेष करून सांगितले.

यावेळी तळेगाव दाभाडे नगरसेविका शोभा भेगडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे, प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ प्रवीण कानडे, वैदयकीय अधिकारी डॉ. पुंजाजी फोले, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, ग्रामपंचायत सदस्य वराळे निलेश शिंदे, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचे अध्यक्ष महेश महाजन, मुख्यसेविका सुधा देसले, उपसरपंच आंबी बाबासो घोजगे, युवा उद्योजक  समीर जाधव, नितीन गाडे, सुदुंबरे सरपंच सुनिता गाडे, सुदवडी सरपंच रंजना शेडे, नानोली सरपंच मोनिका शिंदे, वराळे सरपंच मनीषा शिंदे, उपसरपंच विशाल मराठे, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण मराठे, आणि आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.