Talegaon : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची अतिक्रमण कारवाई पुन्हा सुरु

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची अतिक्रमण कारवाई पुन्हा सुरु झाली आहे. शहरातील स्टेशन रोडवर ही कारवाई करण्यात आली. चारचाकी आईस्क्रीमच्या वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

तळेगाव स्टेशन भागातील शिवाजी चौक, मराठा क्रांती चौक येथील अनधिकृत विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. शहरातील अनधिकृत पथारीवाले, हातगाडी व्यावसायिकांनी मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण केल्यामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे.

वारंवार कारवाई करून सुद्धा हे विक्रेते पुन्हा अतिक्रमण करत असल्याचे नगरपरिषद प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने संबंधितांवर पोलीस कारवाई केल्याची माहिती मुख्याधिकारी वैभव आवारे आणि तळेगाव दाभाडे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.