Talegaon Dabhade : महिलांनी घेतले लाइटच्या माळा बनविण्याचे प्रशिक्षण

एमपीसी न्यूज- एमपीसी न्यूज- गणेशोत्सव, दिवाळीमध्ये घरातल्या घरात विद्युत रोषणाई करता यावी तसेच त्यामधून महिलांना व्यवसायाची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने महिलांसाठी लाइटच्या माळा तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या महिला बालकल्याण समितीच्या माध्यमातून नगरसेविका कल्पना भोपळे व नगरसेवक संदीप शेळके यांनी प्रभाग क्रमांक 1 मधील महिलांसाठी या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले होते.

प्रभागातील 70 महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. यावेळी महिला बालकल्याणच्या सभापती संध्या भेगडे, नगरसेविका नीता काळोखे, हेमलता खळदे, अनिता पवार, काजल गटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन विजया शेळके यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.