_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Talegaon Dabhade : क्रिकेटवीर हर्षवर्धन काकडेची शानदार कामगिरी

एमपीसी न्यूज- पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे शुक्रवारी (ता.२२) आयोजित कोहिनूर चषक क्रिकेट स्पर्धेत तळेगाव दाभाडे येथील डी वाय पाटील स्कूलचा विद्यार्थी, क्रिकेटवीर कर्णधार हर्षवर्धन संग्राम काकडे याने शानदार कामगिरी केली.

14 वर्षांखालील खेळाडूंसाठी पुण्यातील विधी महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या सामन्यात पदार्पणाच्या पहिल्याच वर्षी डी वाय पाटील स्कूलच्या संघाने 128 धावांचे आवाहन स्वीकारुन भारतीय विद्या भवन परांजपे विद्या मंदिरच्या संघावर 8 गडी राखून विजय मिळवला.

_MPC_DIR_MPU_II

हर्षवर्धनने चार षटकांत दोन बळी घेत 57 चेंडूमध्ये 76 धावा पटकावल्या. या कामगिरीबद्दल हर्षवर्धनला मॅन ऑफ दि मॅचचा बहुमान मिळाला. आता डीवाय पाटील स्कूलचा संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला आहे. या कामगिरीमुळे हर्षवर्धन आता पुणे जिल्ह्यातील २४८ क्रिकेटपटूंमध्ये सहाव्या रॅन्कवर पोहोचला आहे.

हर्षवर्धन हा तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष तथा विदयमान नगरसेवक संग्राम काकडे यांचा मुलगा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.