Talegaon-Dabhade: बनावट सह्यांचे मृत्यूपत्र करत सदनिका बळकावणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज : बनावट सह्यांच्या आधारे मृत्युपत्र बनवून सदनिका बळकावण्याचा प्रयत्न केल्याबद्दल एकास अटक करण्यात आली आहे.(Talegaon-Dabhade) ही घटना 1 एप्रिल 2020 ते 18 ऑगस्ट 2022 या कालावधीत तळेगाव-दाभाडे येथे घडली.

आसिफ ताजपीर शेख (वय 51, रा. तळेगाव दाभाडे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी प्रसाद सदाशिव मराठे (वय 44, रा. विकास नगर, देहूरोड) यांनी गुरुवारी (दि. 18) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Crime News : पोलीस आयुक्तांच्या नावाने थेट पोलिसांनाच फसविण्याचा प्रयत्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मावशी सुनीता कानडे यांच्या नावावर तळेगाव-दाभाडे येथील मेघना सोसायटीमध्ये एक सदनिका आहे.(Talegaon-Dabhade) आरोपीने फिर्यादीच्या मावशीच्या बनावट सह्या करून मावशीचे मृत्युपत्र बनवले. फिर्यादी यांच्या संमतीशिवाय फिर्यादी यांच्या मावशीच्या सदनिकेत अनधिकृतपणे प्रवेश करून अतिक्रमण केले.याप्रकरणी तळेगा-दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.