Talegaon Dabhade : डी वाय पाटील कॉलेजला मावळच्या तहसीलदारांकडून कारणे दाखवा नोटीस

कॉलेजमधील प्राध्यापकांना नोकरीवरून कमी केल्याचे प्रकरण

एमपीसी न्यूज- आंबी येथील डी वाय पाटील कॉलेजमधील 30 ते 40 प्राध्यापकांना नोकरीवरून कमी केल्याप्रकरणी कॉलेज प्रशासनाला मावळच्या तहसीलदारांकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

आंबी येथील डॉ. डी वाय पाटील कॉलेजमधून अचानकपणे 30 ते 40 प्राध्यापकांना कोणतेही योग्य कारण न देता राजीनामा देण्याकरिता सांगण्यात आले. त्यामध्ये नव्याने रुजू करून घेतलेल्या प्राध्यापकांचा देखील समावेश आहे. 25 सप्टेंबरपासून कॉलेजला येऊ नये असे कॉलेजच्या प्राचार्याकडून 23 ऑगस्ट 2019 रोजी सांगण्यात आले. त्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन यामधून मार्ग काढण्याची विनंती केली होती.

त्याची दखल घेत मावळचे तहसीलदार व दंडाधिकारी यांनी डॉ. डी .वाय पाटील महाविद्यालयाला कारणे नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये प्राध्यापकांना नोकरीवरून का काढले ? याचे उत्तर लवकरात लवकर द्यावे तसेच त्यांना कामावर पुन्हा रुजू करणार की नाही ? याचे उत्तर देणे बंधनकारक केले आहे. अशी माहिती प्रदीप नाईक यांनी दिली आहे. ‘माझ्या कामाचे चीज झाले’ अशी प्रतिक्रिया प्रदीप नाईक यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.