Talegaon Dabhade : दहीहंडी उत्सव रद्द करून पूरग्रस्तांना मावळ प्रबोधिनीकडून मदतीचा हात

एमपीसी न्यूज- कोल्हापुर-सांगली येथे निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीमुळे मावळ प्रबोधिनी आयोजित तळेगाव दाभाडे येथे होणारा “दहिहंडी उत्सव 2019” रद्द करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी होणारा खर्च पुरग्रस्त बांधवांसाठी मदतनिधी स्वरूपात मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आला.

सदरील रक्कमेचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी मावळ प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र भेगडे, तळेगाव नगरपालिकेचे नगरसेवक अमोल शेटे, देहुरोड कॅंटोन्मेंटचे नगरसेवक रघुवीर शेलार, सचिन भेगडे आदी उपस्थित होते. मावळ तालुक्यातील काही महत्वाच्या विषयांवर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यात आली.

तसेच रवींद्र भेगडे मित्र परिवार व नगरसेवक रघुवीर शेलार यांनी सांगली जिल्ह्यातील बहे, नरसिंहपुर, बिचुद, कोळे, खुनी, खरातवाडी, रेठरे, हरणाक्ष, ताकारी, बोरगाव, नांदवे, नवे खेड, जुने खेड, भिलवडी या गावांमध्ये जाऊन जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य तसेच स्वच्छतेचे साहित्य यांचे वाटप केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.