Talegaon Dabhade : मावळ प्रबोधिनीच्या वतीने उत्साहात दहीहंडी साजरी

एमपीसी न्यूज- मावळ प्रबोधिनीचे संस्थापक रवींद्र भेगडे यांच्या पुढाकाराने यंदाच्या वर्षी संपन्न झालेल्या दहीहंडी उत्सवात कृष्णजन्माष्टमी व गोपाळकाल्याचा सार्वजनिक दहीहंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. आमदार दिगंबर भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित समारंभ ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त बाळासाहेब जांभुळकर यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

परांजपे विद्यालयाच्या प्रागंणात झालेल्या कार्यक्रमात रवींद्र भेगडे यांच्या वतीने सामाजिक कार्याबरोबर सार्वजनिक कार्यक्रमांची सांस्कृतिक मेजवानी नागरिकांना मिळाली. या प्रसंगी विविध भागातील गोविंदा पथके सहभागी झाली होती. मावळ तालुक्यासह इतर शहरी भागातील सहभागी 11 संघानी सलामी दिली. या प्रसंगी घाटकोपर येथील मोरया गोविंदा पथकाने दहीहंडी फोडण्याचा मान पाठकविला कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग खेळाडू नितीन म्हाळस्कर, आंतराष्ट्रीय कुंग -फु खेळाडू संदीप कुंजीर तसेच दुर्ग संवर्धन संस्था आणि शिवदुर्ग संस्थेला सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. बहुसंख्य नागरिकांनी उत्साहाची मनमुराद मजा लुटली.

या प्रसंगी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री मदन बाफना, माजी आमदार कृष्णराव भेगडे, दिगंबर भेगडे, पंचायत समिती सभापती गुलाबकाका म्हाळस्कर, माउली दाभाडे, प्रशांत ढोरे, बाळासाहेब जांभुळकर, गणेश ढोरे, विठ्ठलराव शिंदे, रवींद्र दाभाडे, अविनाश बवरे, चंद्रकांत शेटे, शामराव दाभाडे , उद्धवराव शेलार, गणेश भोंडवे, ज्ञानेश्वर दळवी, साहेबराव काशीद, साहेबराव कारके, शोभाताई कदम, शांताराम कदम, निकिता घोटकुले, चित्राताई जगनाडे, मयूरशेठ ढोरे, गणेशशेठ खांडगे, अर्चनाताई म्हाळस्कर, राजू खांडभोर, अतिश परदेशी, किरण भिलारे, विलास काळोखे, अशोक काळोखे, संदीप शेळके , क्रांतीताई सोमवंशी, पांडुरंग ठाकर, संतोष शेळके, राजेश मुऱ्हे, सुनील शेळके, नीता काळोखे, संध्या भेगडे, शोभा भेगडे, रजनीताई ठाकूर, कल्पना भोपळे ,लिला शेवकर, पंढरीनाथ ढोरे, अरुण भेगडे, अरुण .ज. भेगडे, संतोष शिंदे, अजय भेगडे, गणेशअप्पा भेगडे, शंकरराव आडकर, शिवाजी आसवले, कांताराम ठाकर, बाळासाहेब घोटकुले, नामदेवराव भसे, दिलीप ढोरे, प्रशांत भागवत, आशिष ढोरे, नवनाथ मुर्हे, विष्णू मुऱ्हे, किरण म्हाळस्कर, दिलीप म्हाळस्कर, किरण भिल्लारे, दत्ताअण्णा पडवळ, सुदाम कदम, सुभाष धामणकर, जालिंदर धामणकर, बळीराम भोईरकर, दत्ता पडवळ, भारत जोरी, दत्ता मोधले, दत्ता खेंगले, विठ्ठल दादा घारे, तुषार जगताप, उमेश बोडके, विक्रम बोडके, जालिंदर गाडे, शशिकांत ठाकर, मदन शेडगे, शांताराम सातकर, सचिन येवले, आनंदा येवले, गणेश गाडे, विजय जाधव, नितीन दगडे, गुलाब गाभाले आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे नियोजन अमोल शेटे, रघुवीर शेलार, विनीत भेगडे, अवधूत पोंक्षे, सदानंद पिलाने, भगवान भसे, प्रशांत दाभाडे, विनायक भेगडे, संदेश शेलार, सुरज सातकर, निलेश पारगे, अतुल सातकर, रवी शेटे, नितीन येवले, राहुल पारगे, तेजस दाभाडे आदींनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.