Talegaon Dabhade : ‘मदर टीचर’ पुरस्काराने सन्मानित दमयंती खान यांचे निधन

एमपीसी न्युज – जुन्या पिढीतील आदर्श शिक्षिका (Talegaon Dabhade) दमयंती आफताब खान (वय 85) यांचे मंगळवारी (ता. 31) तळेगाव दाभाडे येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे निधन झाले.

मावळ तालुक्यात त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत 39 वर्षे अध्यापन केले. 1994 साली जागतिक आरोग्य संघटनेच्या अमेरिकेतील शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेच्या उर्सेगाव प्राथमिक शाळेच्या भेटी दरम्यान मुख्याध्यापिका दमयंती खान यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांना ‘मदर टीचर’ म्हणून गौरविले होते.

Pune News : आरोपी पकडा आणि बक्षीस मिळवा ; पोलीस कर्मचाऱ्यांसाठी अनोखी योजना

पत्रकार अमिन खान आणि आकुर्डी येथील (Talegaon Dabhade) सामाजिक कार्यकर्ते हमीद खान यांच्या त्या मातु:श्री होत. त्यांच्या पश्चात एक मुलगी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.