Talegaon Dabhade : दत्तात्रय गायकवाड यांची महाराष्ट्र भाजपा कामगार सेलच्या सचिव पदी नियुक्ती

एमपीसी न्यूज – चाकण महाळुंगे औद्योगिक (Talegaon Dabhade) क्षेत्रातील हिताची अष्टमो प्रायव्हेट लिमिटेड कामगार युनियनचे विद्यमान अध्यक्ष दत्तात्रय संभाजी गायकवाड यांची महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या कामगार सेलच्या सचिव पदी नियुक्ती झाली. महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे कामगार सेलचे अध्यक्ष गणेश लक्ष्मण ताठे यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले.
महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या मुंबई कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे होते. यावेळी श्री गायकवाड यांनी आतापर्यंत केलेल्या संघटनाच्या कार्याबद्दल कौतुक करण्यात आले तसेच त्यांची महाराष्ट्र प्रदेश कामगार सेलच्या सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.

 

Alandi News : भामा आसखेड येथील पाणीपुरवठा आळंदीस सुरळीतपणे सुरू

पूर्वीच्या के एम फाईव कंपनीमध्ये अंतर्गत कामगार युनियन स्थापन करण्यामध्ये श्री गायकवाड यांचा सिंहाचा वाटा आहे अंतर्गत युनियन स्थापन झाल्यानंतर सलग तीन वेळा झालेल्या निवडणुकीमध्ये ते कामगार नेता म्हणून निवडून आले तसेच दोन वेळा विद्यमान अध्यक्ष म्हणून देखील गायकवाड यांनी पद भूषविलेले आहे. या अगोदर भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्र कामगार सेलच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष या पदावर त्यांनी जबाबदारी पार पाडली होती.त्यांनी केलेले संघटन व कार्य पाहून पक्षाने त्यांच्यावर प्रदेश कार्यकारणी मधून सचिव पदाची जबाबदारी सोपवलेली आहे त्यांची निवड झाल्यानंतर कंपनीमध्ये व गावपातळी वर कामगारांनी फटाके (Talegaon Dabhade) वाजवून स्वागत केले व शुभेच्छा व्यक्त केल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.