Talegaon Dabhade : दत्तात्रय पडवळ राष्ट्रीय भास्कर अँवार्डस 2019 पुरस्काराने सन्मानित

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र जर्नालिस्ट यांच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय भास्कर अँवार्डस 2019 चा पुरस्कार दत्तात्रय पडवळ यांना, ग्रामविकास व सामाजिक यामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल हा पुरस्कार आदर्श सरपंच पुरस्कार म्हणून गौरवण्यात आले. हा पुरस्कार गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामुळे नवलाख उंब्रे ग्रामपंचायतीचा गौरव झाल्याचे सांगण्यात आले.

यावेळी केंद्रीय कायदा मंत्री अॅड. रमाकांत खलफ, पंतप्रधान यांच्या भगिनी वसंती बेन मोदी, मिंदा कंपनीच्या संचालिका सारीका मिंदा, केरळचे गायक पी. एस. विद्याधरन, गोवा कामगार नेते अॅड. रणजीत सिंह राणे, गोवा राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर नाईक, पत्रकार पतंग पाटील यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

  • यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे भाषण झाले ते म्हणाले, हा पुरस्कार तुम्हाला प्रेरणादायी ठरो. पुढील काळात तुमचे कार्य असेच चालत राहो. पुरस्कार भेटला कि आपली जबाबदारी वाढत असते. तुमच्यासारखे लोक समाजाचे काम करता म्हणून तर समाज हा पुढे जात असतो. आपण असेच पुढील काळातमध्ये काम करा आणि देशाच्या सेवेत भर दया .

यावेळी सूत्रसंचालन पत्रकार विजय लोहार यांनी केले. आभार प्रदर्शन डाॅ राजीव लोहार यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.