Talegaon Dabhade: प्रा. दीपक बिचे यांचे करिअरसंबंधी उद्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Talegaon Dabhade: Deepak Biche's career guidance to students tomorrow

एमपीसी न्यूज– रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या वतीने ‘इ 10 वी व 12 वी नंतर काय?’ या विषयावर प्रा. दीपक निळकंठ बिचे हे फेसबुकवर लाईव्ह येत करिअर संबंधी मार्गदर्शन करणार आहेत.

प्रा. दीपक बिचे यांची मुलाखत रविवारी (दि.7) रोजी सकाळी 11 वाजता फेसबुक लाईव्हवर प्रसारित होणार आहे. याबाबत रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या वतीने माहिती देण्यात आली आहे.

त्यांच्याशी नापासांची शाळा व यज्ञ कोचिंग क्लासचे संस्थापक नितीन फाकटकर हे वार्तालाप करणार आहेत. मावळ तालुक्यात प्रथमच असा आगळा वेगळा उपक्रम रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या वतीने राबविण्यात येत आहे.

समाजातील नामवंत व्यक्तींच्या जडणघडणीचा उलगडा यामाध्यमातून घेतला जाणार आहे. करिअर म्हणजे भविष्याकडे जाण्याचा मार्ग असून विविध करिअरचे मार्ग निवडताना तसेच जीवनात यशस्वी होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही, तर आत्मविश्वास व योग्य परिश्रमाची गरज आहे.

करिअर निवडताना स्वतःमधील बलस्थाने ओळखून आवड, कल व क्षमता यांचा विचार करून संधी ओळखून जीवनाची दिशा कशी ठरवायची आणि कसे यश मिळवायचं, यशस्वी कसं व्हावं याबद्दल प्रा दीपक बिचे यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना ऐकण्यास मिळणार आहे.

ही मुलाखत प्रत्येक विद्यार्थ्यानी पाहावी, असे आवाहनही रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.