Talegaon Dabhade : त्रिपुरारी पौर्णिमे निमित्त श्री डोळसनाथ महाराज मंदिरात नेत्रदीपक “दीपोत्सव” साजरा

एमपीसी न्यूज- त्रिपुरारी पौर्णिमे निमित्त तळेगाव दाभाडे येथील ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिरात गुरुवारी (दि. २२) नयनरम्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. श्री डोळसनाथ महाराजांच्या सभामंडपात ” वाऱ्याचा मारा सोसत दिवा आपली ज्योत टिकवतो ! संघर्षानंतर प्रकाश असतो जणू हेच तो आपल्याला शिकवतो !! ” या संकल्पनेतून काढण्यात आलेल्या भव्य रांगोळीच्या आवती भोवती तब्बल 5 हजार आकर्षक दिव्यांची आरास करून परिसर प्रकाशमान करण्यात आला. हा दीपोत्सव पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज , पाणी वाचवा – जीवन वाचवा , बेटी बचाओ – बेटी पढाओ, स्वच्छतेचा संदेश , भारतीय जवानांना मानवंदना , वारी “ती” ची, पंढरीची वारी अश्या विविध सामाजिक विषयांवरील रांगोळ्यांद्वारे सामाजिकतेचा संदेश देण्यात आला . त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा, असुरांचा व अंधकारमय बाबींचा नाश केला आणि मानवाला प्रकाशमान जीवन प्राप्त करुन दिले. या अनुषंगाने फुलांतून साकारण्यात आलेल्या भगवान शंकरांच्या पिंडीची पूजा अर्चनाही करण्यात आली .

दीपोत्सवाचे उदघाटन संत तुकाराम सह साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे , नगराध्यक्षा सौ. चित्राताई जगनाडे, मा. नगराध्यक्ष सुरेश धोत्रे ,पोलीस निरीक्षक भानुदास जाधव, संत तु. साखर कारखाना संचालक अंकुश आंबेकर , वसंतराव भेगडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्वांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

श्री डोळसनाथ पतसंस्था व नगरसेवक संतोषभाऊ भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने साकारण्यात आलेल्या दीपोत्सवाचे हे ३ रे वर्ष असून यावेळी उपक्रमाचे आयोजक नगरसेवक संतोष भेगडे, डोळसनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष शरद भोंगाडे, यांच्या समवेत नगरसेवक अरुण माने, अमोल शेटे, आनंद भेगडे, माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, माजी नगरसेवक दिलीप खळदे, यादवेंद्र खळदे, नगरसेवक श्रीराम कुबेर, नगरसेविका मंगलताई भेगडे, वैशाली दाभाडे, शोभाताई भेगडे, सुरेखाताई जाधव, शुभांगीताई शिरसाट, संध्याताई भेगडे, माजी नगराध्यक्षा मायाताई भेगडे, नगरसेविका रत्नाताई भेगडे, माजी रजनीताई भेगडे, नारायण ठाकर उदयोजक कौस्तुभ भेगडे, सचिव सतीश भेगडे, उपाध्यक्ष राहुल पारगे व सर्व संचालक मंडळ, आशिष खांडगे, सुनील गायकवाड, दिनकर भेगडे, वैभव भेगडे, नितीन भेगडे, विनोद उर्फ बंटी भेगडे, योगेश भोर, दीपेश बुट्टे पाटील आदी मान्यवर व तरुण ऐक्य मित्र मंडळ सर्व कार्यकर्ते व तळेगावासह पंचक्रोशीत असंख्य नागरिक उपस्थित होते.

मागील दोन वर्षांपासून साकारत असलेल्या दीपोत्सवाच्या यंदाच्या ३ ऱ्या वर्षीही उपक्रमाला भाविकांचा बहुमोल प्रतिसाद लाभल्या बद्दल उपक्रमाचे आयोजक नगरसेवक संतोषभाऊ भेगडे यांनी सर्वांचे आभार मानले.
डोळसनाथ तालीम मित्र मंडळाचे विशेष सहकार्य लाभले. प्रकाश योजना व सजावट व्ही.एम. झेड डेकोरेटर्स यांनी केली होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल धर्माधिकारी यांनी केले. तमाम उपस्थितांचे स्वागत मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी केले. सुमधुर भक्ती – संगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.