BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : दिव्यांगाना व्यावसाईक गळ्यामध्ये आरक्षण देण्याची मागणी

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने दिव्यांगाना व्यावसाईक गळ्यामध्ये आरक्षण द्यावे, अशी मागणी संबंधित संस्थांनी केली आहे. याबाबतचे निवेदनही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. तसेच जर आपल्या मागण्याचा विचार केला गेला नाही तर नगरपरिषदे समोर उपोषण करणार येणार आहे, असा इशाराही दिला आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतफॆ॑ मारूती मंदिर चौक व जिजामाता चौक येथील इमारतीत व्यावसाईक गाळे बांधले आहे. या गाळ्यामध्ये 5 टक्के दिव्यांगाना आरक्षण देण्यात येणार होते. परंतू दिनांक 8/3/2019 रोजी एका दैनिकात नगरपरिषदेच्या वतीने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या जाहिरातीत दिव्यांगाना आरक्षण देण्यात आलेले नाही.

त्यामुळे अधिक माहितीसाठी संपर्क साधला असता नगरपरिषद प्रशासनाने आपल्या सस्थेंस आरक्षण देण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे दिव्यांग विकास संस्था तळेगाव दाभाडे आणि प्रहार क्रांती संघटना तळेगाव दाभाडे यांचे वतीने तसेच संदिप भोसलकर, अध्यक्ष प्रहार क्रांती संघटना मावळ यांचे मार्गदर्शनाखाली आणि किशोर भेगडे विरोधी पक्षनेते नगरपरिषद यांचे उपस्थितीत हरकत निवेदन देण्यात आलेले आहे.

त्यामध्ये नगरपरिषद प्रशासनाने 7 दिवसामध्ये दिव्यांगाना आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आह. जर आपल्या मागण्याचा विचार केला गेला नाही तर दिव्यांग विकास संस्था तळेगाव दाभाडे आणि प्रहार क्रांती संघटना यांचे वतीने नगरपरिषदे समोर उपोषण करणार येणार आहे, असा इशाराही दिला आहे.

.

HB_POST_END_FTR-A1
.