Talegaon Dabhade : तळेगाव येथून लोणावळा आणि पुण्यासाठी बस सुरु करण्याची मागणी

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे ते पुणे मनपा तसेच तळेगाव दाभाडे ते लोणावळा बस सेवा सुरू करावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता प्रदीप नाईक यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन उपजिल्हाधिकारी डॉ जयश्री कटारिया यांच्याकडे देण्यात आले.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तळेगावहून दररोज महाविद्यालयीन विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक पुण्याला जातात. बसचा प्रवास हा सुखकर व सोयीस्कर असल्याकारणाने नागरिकांचे जाणे सोपे होते. परंतु, सध्या तळेगाव दाभाडे येथून पुण्यात जाणारी एकही थेट बस नाही. प्रवाशांना निगडीहुन दुसऱ्या बसने पुण्यात पर्यंत जावे लागते. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे

तसेच तळेगाव दाभाडे ते लोणावळा प्रवास करण्यासाठी एकही बस उपलब्ध नाही. तळेगाव दाभाडे ते लोणावळा या मार्गावर सुद्धा बस सेवा चालू कराव्यात अशी मागणी प्रदीप नाईक यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.