Talegaon Dabhade : आमदार सुनील शेळके यांना मंत्रीमंडळात संधी देण्याची मागणी

एमपीसी न्यूज – मावळच्या गतिमान विकासासाठी नवनिर्वाचित आमदार सुनील शेळके यांना मंत्रीमंडळात संधी देण्यात यावी अशी मागणी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश खांडगे यांनी केली.

सुनिल शेळके यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल गणेश खांडगे मित्र परिवाराच्या वतीने शनिवार (दि 16) रोजी शेळके यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.यावेळी झालेल्या बैठकीत ही मागणी करण्यात आली.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, विधी मंडळाचे नेते अजित पवार, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना खांडगे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी या मागणीचे निवेदन दिले आहे.

मामासहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात खांडगे यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

यावेळी प्रदेश चिटणीस विक्रम कदम, खरेदी विक्री संघाचे संचालक प्रकाश पवार, राष्ट्रवादी युवकचे कार्याध्यक्ष शिवाजी असवले ,राष्ट्रवादी सेवादलाचे अध्यक्ष जालिंदर शेटे, माजी उपसरपंच संदीप शेटे, राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष बळिराम मराठे, ,माजी सरपंच जालिंदर गाडे, माजी उपसरपंच सोपान नरवडे, विजय भोंगाडे, समीर जाधव, योगेश नाटक उपस्थित होते.

आमदार शेळके म्हणाले; ” व्यक्ती निष्ठेपेक्षा पक्ष निष्ठेला महत्व देऊन पक्ष संघटनेसाठी सर्वांनी साथ द्यावी. तालुक्याच्या सर्वागीण विकासावर भर देण्यासाठी प्रयत्नशील राहील.

प्रदेश चिटणीस विक्रम कदम यांनी प्रास्ताविक केले. संतोष नरवडे यांनी सूत्रसंचालन केले. योगेश नाटक यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like