Talegaon Dabhade :उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी ‘दिनदर्शिके’चे प्रकाशन

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी ‘दिनदर्शिके’चे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी चिटणीस विक्रम कदम यांच्या पुढाकाराने मागील सात वर्षापासून मावळातील गोरगरीब जनतेला ‘दिनदर्शिके’चे वाटप केले जाते. मुंबई येथे पवार यांच्या दालनात हे प्रकाशन करण्यात आले.

तत्पूर्वी.मावळ तालुक्यातील पक्षाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेतली. पक्षाला या विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशाचे पवार यांनी कौतुक केले.

प्रदेश चिटणीस विक्रम कदम, राष्ट्रवादी सेवादलाचे तालुकाध्यक्ष जालिंदर शेटे, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष संतोष नरवडे, माजी उपसरपंच संदीप शेटे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी ज्येष्ठ नागरिक सेलचे उपाध्यक्ष सोपान नरवडे ग्रामपंचायत सदस्य साईनाथ गवारी,पत्रकार रामदास वाडेकर उपस्थित होते.

पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. सर्वसामान्य गरीब कुटुंबात मोफत दिनदर्शिका वाटपाचे हे सातवे वर्षे आहे.
विक्रम कदम म्हणाले, ” मागील सात वर्षापासून पक्षाची दिनदर्शिका प्रकाशित करून प्रकाशन अजित पवार यांच्या हस्ते केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.